Home » ….म्हणून नाशिक येथील रोहनच्या ‘श्वाना’चा बनवला पासपोर्ट

….म्हणून नाशिक येथील रोहनच्या ‘श्वाना’चा बनवला पासपोर्ट

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

रशियाने युक्रेनवर युद्धामुळे युक्रेनमधील अनेक विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. यातच नाशिकचा रोहन उंबरे या विद्यार्थी देखील आपल्या लाडक्या श्वानासोबत घरी परतल्याने कुटुंबियांना आनंद व्यक्त केला आहे.

गेल्या आठवडाभरापासून रशिया युक्रेन या दोन देशात युद्ध सुरु असून यामुळे येथे शिकणाऱ्या भारतीयु विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच नाशिकचा रोहन उंबरे हा देखील युक्रेनमध्ये अडकून होता. त्यामुळे भारत सरकरांकडून त्याला देखील आणण्यात येणार होते. मात्र श्वानाला घेतल्याशिवाय येणार नसल्याचे तो सांगत होता. यासाठी श्वानाचा देखील पासपोर्ट तयार करण्यात आला.

दरम्यान यासाठी जवळपास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागला. एवढ्या भीषण परिस्थितीत देखील रोहनने आपल्या श्वानाला मायदेशी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. नव्हे तो श्वानास घेतल्याशिवाय येणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. अखेर ‘डेल्टा’ नाव असलेल्या या श्वानाचा पासपोर्ट तयार करत अतिशय खडतर असा प्रवास करून अखेर तो आज पहाटे नाशिकला पोहोचला.

नाशिकच्या मखमलाबाद रोड परिसरात राहणारा रोहन उंबरे हा विद्यार्थी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये राहत आहे याच दरम्यान त्याने डेल्टा या श्वानाला ०२ महिन्याचा असताना आपला फॅमिली मेंबर बनवले आणि तेव्हापासून रोहन युक्रेन मध्ये डेल्टा सोबत वास्तव्यास आहे. रशियाने यूक्रेन वर हल्ला केल्यानंतर तातडीने भारतीय विद्यार्थ्यांनी यूक्रेन सोडावे असं आव्हान करण्यात आले होते.

इतर विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी निघाले, मात्र रोहनने आपल्या डेल्टा श्वानाला देखील सोबत घेऊन जायचं निश्चय केला.. आणि अनेक अडचणीवर मात करत त्याने आपल्या या लाडक्या डेल्टा श्वानासोबत सुखरूप घरी परतला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!