गारवा! नाशिकमध्ये पावसाच्या हलक्या सरी!

नाशिक | प्रतिनिधी

सकाळच्या उकड्यानंतर अचानक दुपारनंतर ढगाळ हवामान तयार होऊन सायंकाळी नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचे दिवस सुरू झाल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान हवामान विभागाकडून कालच राज्यातील अनेक जिल्ह्याना येलो अलर्ट घोषित केला होता.

हवामान विभागाच्या नुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान (Rainy Weather) निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता (heavy rainfall) वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आज नाशिकमधील गंगापूर रोड, आंनदवल्ली, गिरणारे परिसर, नाशिक शहरातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला.

दरम्यान दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. यावेळी अनेकजण या पावसाचा आनंद घेताना दिसून आले.