रशियाची अंशतः युध्दविरामाची घोषणा, युक्रेन सोडू इच्छिणाऱ्यांसाठी निर्णय

नवी दिल्ली । प्रतिनिधी

‘युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिक सुखरूप बाहेर पडेपर्यंत रशियाची अंशतः युध्दविरामाची घोषणा करण्यात आली असून आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून युध्दविरामाला सुरुवात झाली. यामुळे एकीकडे युद्धामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असताना अशाप्रकारे युद्धच थांबवावे अशी मागणी करण्यात येत आहे.

दिवसेंदिवस रशिया युक्रेन युद्धाची परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र यामध्ये अनेकांचे नाहक बळी जात आहेत. दरम्यान रशियाकडून काही काळासाठी आता युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. या काळात युक्रेन सोडू इच्छिणारे नागरिक सुरक्षित बाहेर पडू शकतील. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी देखील हा मोठा दिलासा आहे.

गेल्या १० दिवसांपासून रशियाने युक्रेनवर हल्ले (Russia vs Ukraine) सुरू केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये हाहाकार उडाला आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. मात्र आता रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनमधून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने पाच तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे.

आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये दोनदा चर्चा झाल्या असून, तिसऱ्यांदा बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. अनेक लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. रशियाने आता युद्धविरामाची घोषणा केल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.