नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या सुरक्षा महामंडळाचे वर्षभराचे पैसे थकविल्याने सुरक्षारक्षक कर्मचार्यांचे बिनपगारावर काम करावे लागत आहे. वेतन झाले नसल्याने त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत.
नाशिक महानगरपालिकेने ४१० सुरक्षा रक्षक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने म्हणुन पालिकेतील विविध विभागांमध्ये नेमणूक केली आहे. कोविड सेंटर, क्षेत्रीय कार्यालये, पालिकेची उद्याने अशा विविध ठिकाणी या सर्वांची ड्युटी असते. मात्र वर्षभरापासून सुरक्षा महामंडळाचे पैसे थकविल्याचे निदर्शनास आले आहे. लाखो रुपयांचे मनपाने पैसे थकविल्यानं सुरक्षा रक्षकांचे वेतन रखडले आहे .
या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले आहे. प्रशासनाने ठराव सादर करून अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.