Home » नाशिकच्या म्हसरूळ परिसरात स्कुल व्हॅनला आग

नाशिकच्या म्हसरूळ परिसरात स्कुल व्हॅनला आग

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील पंचवटी परिसरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सर्वानी सुटकेचा निस्वास टाकला.

सध्या शहरातील शाळा सुरु असून शाळेतून विद्यार्थ्यांना घरी सोडताना हि घटना घडली. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे स्कुल व्हॅनला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत स्कुल व्हॅन जळून पूर्णपणे खाक झाली असून सुदैवाने स्कुल व्हॅनमधील विद्यार्थी आणि दोन शिक्षिका बचावल्या आहेत.

दरम्यान गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबवून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. तसेच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्या आणली. मात्र तोपर्यंत व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली होती.

या घटनेने पुन्हा शालेय विदयार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न उपस्थित झाला असून यापूर्वी देखील नाशिक शहरात अशा घटना पाहायला मिळाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाने याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे लक्षात येते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!