उद्यापासून शाळेला चाललो आम्ही, पण हे नियम पाळाच, अन्यथा..!

नाशिक | प्रतिनिधी

उद्यापासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची घंटा वाजणार असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अनेक दिवसांच्या कालावधीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून नाशिक शहर आणि जिखा भरतील शाळा सुरू होणार आहेत.

एकीकडे उद्यापासून शाळांना सुरवात तर दुसरीकडे ओमायक्रोन सावट असल्याने शाळा सुरळीत चालणार का? तसेच या व्हेरिएंटमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये ग्रामीण भागात पहिली चौथी पर्यंत तसेच शहरात पहिली ते सातवी पर्यंत वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.

या पूर्वी ज्या पद्धतीने कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे या शाळाही सुरू करण्यात येत आहे.

शाळांसाठीची नियमावली

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक

शाळेचा सर्व परिसर निर्जंतुक केलेला असावा.

विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात.

शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी, शिक्षकांनी लशीचे दोन्ही डोस तातडीने पूर्ण करावेत.

विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, फेस मास्क याचा पुरवठा करावा.

शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी गर्दी करणार नाहीत, याची शाळांनी काळजी घ्यावी.