Home » सर्वसामान्यांचा आधारवड हरपला! प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन

सर्वसामान्यांचा आधारवड हरपला! प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. डॉ. एन. डी .पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान दोन दिवसापासून एन. डी. पाटील यांची प्रकृती बिघडली होती. यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. परिणामी त्यांनी काही दिवसांपासून अन्नपाणी देखील सोडले होते. ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. परंतु डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रा.डॉ. एन.डी. पाटील यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र आज त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना जनमानसात आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!