शार्दूल ठाकूरची पडली विकेट, साखरपुड्याचे फोटो व्हायरल

मुंबई । प्रतिनिधी

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली परुलकर लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज असून जोडप्याचे नुकतंच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये साखरपुडा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर 2022 मध्ये ठाकूर आणि मितालीचे लग्न होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघातील जलद गोलंदाज शार्दूल ठाकूर लवकरच विवाह करणार आहे. शार्दूल त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुळकर हिच्याशी विवाह करणार असून दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या दोघांचा साखरपुडा आज २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमास दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पार पडला. शार्दूलच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर खास क्षणाचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

तीस वर्षांचा शार्दुल शेवटचा T20 विश्वचषक 2021 मध्ये भारताकडून खेळताना दिसला होता. त्या स्पर्धेत त्याला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी एकही विकेट मिळवता आली नव्हती. सध्या ठाकूरला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.