Video : लेकीचं लग्न, डान्स तो बनता है.. संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स

मुंबई । प्रतिनिधी
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांच्या लग्नाच्या संगीत समारंभात खा. संजय राऊत आणि खा. सुप्रिया सुळे यांनी एका गाण्यावर ठेका धरला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

https://youtu.be/wD_A2Jo99S8

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या विवाहबंधनात अडकणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून राऊत कुटुंबाची लगबग सुरू असून स्वत: संजय राऊत यांनी सपत्निक विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत त्यांना या लग्नसोहळ्याचे निमंत्रण देत आहेत. या सोहळ्याआधी राऊत कुटुंबाकडून मुंबईत संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डान्स व्हिडिओची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा होत आहे.

उर्वशी राऊत यांच्या लग्नसोहळ्याआधी आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे या देखील सहभागी होत्या. यावेळी संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांना आग्रह करत एका गाण्यावर ठेका धरण्यास भाग पाडले. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत सुरुवातीला संजय राऊत आणि सुप्रिया सुळे एकत्र नृत्य करताना दिसतात.