शिवसेना मैदानात, महापालिकेवर भगवा फडकवणारच

नाशिक । प्रतिनिधी

आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेने कडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि नागरिकांपर्यंत जास्तीतजास्त पोहचण्यासाठी आज पासून शिवसेना मनामनात, शिवबंधन घराघरात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे..

या उपक्रमाचे उद्घाटन नाशिक रोड परिसरात नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या उपक्रमाच्या अंतर्गत राज्य सरकारने केलेले काम नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा काम कार्यकर्त्यांनी करावा असे आव्हान संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले..

तसेच आगामी निवडणुकीत नाशिक महापालिकेवर कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निश्चय या कार्यक्रम प्रसंगी नेत्यांनी केला..