सत्यजित तांबेंना धक्का;निकटवर्तीय मानस पगार यांचं निधन

नाशिक : पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर काल (बुधवार दि. १ ) एक अपघात झाला होता. या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय असून पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधी सत्यजित तांबे यांनी मानस पगार यांच्या माध्यमातून एक पाठीराखा गमावला असल्याचं म्हंटल जात आहे.

मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय असून सत्यजित तांबे यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र गेल्याच्या भावना त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

सत्यजित तांबे यांचे ट्विट

‘भावपूर्ण श्रद्धांजली.. माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे.’ अशा शब्दांत सत्यजी तांबे यांनी मानस पगार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘या बातमीने मन सुन्न झाले’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सत्यजित तांबे यांनी मानस पगार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

नाशिकच्या आडगाव परिसरातील उड्डाणपुलावर हा अपघात झाला असून या अपघातात १ जणाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी हा अपघात झाला. या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचा मृत्यू झाला त्यामुळे एक उमदे आणि उत्साही युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

समाज माध्यमांवर कॉंग्रेस पक्षाची आक्रमक पणे भूमिका मानस पगार मांडत असत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांच्या घराबाहेर मानस पगार यांनी दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यात मानस पगार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. दरम्यान काल मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मानस पगार यांचे निधन झाले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.