काळाराम मंदिर सत्याग्रहावेळी नाशिकचा राजवाडा चळवळीचे केंद्र होते!

नाशिक । प्रतिनिधी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक आंदोलनांमध्ये नाशिकच्या श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष असे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेबांनी अनेक दिवस विचार केल्यानंतर या सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः सत्याग्रहाचे नेतृत्व करणार हे कळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते.

शोषितांच्या मानवी हक्कासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलने केली. त्यामध्ये नाशिकमधील श्री काळाराम मंदिर सत्याग्रहाचे प्रमुख आंदोलन मानले जाते. ०२ मार्च १९३० मध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली आणि नाशिक शहर चळवळीतल्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनले. दरम्यान या चळवळीसाठी सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड म्हणजे दादासाहेब गायकवाड सत्याग्रह समितीचे अध्यक्ष केशव नारायण वर्देकर होते. शंकरराव गायकवाड ते सभासद होते.

०२ मार्च १९३० च्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत डी.व्ही. प्रधान, बाळासाहेब खरे, सहस्रबुद्धे, स्वामी आनंद, शंकरराव गायकवाड, भाऊराव गायकवाड, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आदि नेतेमंडळी होते. यावेळी धोतर, अंगरखा, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर लाल टिळा लावून शंकरराव गायकवाड यांनी गोदावरी नदीत उडी घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय.. अशा घोषणा दिल्या.नाशिकचा राजवाडा हे चळवळीचे केंद्र होते, तर पाथर्डी नांदूर वैद्य दिंडोरी यासह अनेक गावांनी सर्व प्रकारची मदत या आंदोलनाला पुरवली.

दलित शोषितांना मूलभूत हक्क मिळवून देण्याबरोबरच जातीभेदाची दडपशाही दूर व्हावी, यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्य लोक एकत्र आले होते. हा सत्याग्रह पाच वर्षे ११ महिने आणि पाच दिवस सुरू होता. नाशिकमध्येच एक काळा मंदिर जरी हे आंदोलन असले तरी मंदिर प्रवेश चळवळ म्हणून ओळखले जाते. काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याआधी बहिष्कृत भारत मध्ये बाबासाहेबांनी अग्रलेख लिहिला होता. जोपर्यंत हिंदू म्हणून या समाजाचे आहोत तोपर्यंत मंदिर प्रवेश आमचा अधिकार आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले होते.

०२ मार्च १९३० ला काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ०२ मार्चला सकाळी दहा वाजता गोदा काठावर सभा घेतली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जवळपास सात ते आठ हजार लोक आंदोलन साठी एकत्र आले होते. आंदोलन साठी दुपारी मिरवणूक काढण्यात आली. गोदा काठावर पास होऊन मिरवणूक विसर्जित करण्यात आली.