विद्रोही साहित्य संमेलनात गायक आदर्श शिंदेची हजेरी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक येथे आयोजित विद्रोही साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे हजेरी लावणार आहेत. यामुळे विद्रोही साहित्य संमेलनाला चार चांद लागणार आहे.

नाशिक ४ व ५ डिसेंबर ला आयोजित, संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलन केटीएचएम कॉलेज प्रांगणात होत असून या साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे लाडके गायक आदर्श शिंदे यांची हजेरी लागणार आहे.

तसेच ज्येष्ठ गायिका सुषमा देवी, गायक प्रतापसिंग बोदडे, प्रकाश पाटणकर, दिनकर शिंदे, समर्थक शिंदे, रंगराज ढेंगळे, विजयराज निकम, चेतन लोखंडे, जितू देवरे, रोहित उन्हवणे, रवी बराते, संजय उन्हवणे असे अनेक नामवंत गायक या संमेलनात उपस्थिती राहून आपले गीत गायन प्रदर्शित करणार आहे.