Home » गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचे मुंबईत निधन

गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचे मुंबईत निधन

by नाशिक तक
0 comment

मुंबई । प्रतिनिधी

आपल्या आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

पण त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळायला १९८२ साल उजाडावे लागले. १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लहिरी प्रकाशझोतात आले. त्यानंतर बप्पी लहरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले. बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लहिरी आणि त्यांची मुलगी – गायिका रेमा लहिरी बन्सल असा परिवार आहे.

२०२० मध्ये बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. ब्रीच कँडी रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. बप्पी लहिरी यांचे मूळ नाव आलोकेश लहरी असे होते. सत्तरीच्या दशकात बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतक्षेत्रात अनेक नवे प्रयोग केले

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!