लग्नासाठी वहिनीचा होता अडथळा; दिरांनी कायमचाच विषय संपवला

वहिनीमुळे लग्नात अडथळा येत होता. हा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी दोन दिरांनी धक्कादायक पाऊल उचलले आणि वहिनीला संपवलले. ही घटना राजस्थान राज्यातून समोर आली आहे. जालौर जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणात वहिनीसह एका मध्यस्ती करत भांडण सोडविण्यासाठी आलेल्या शेजाऱ्याचा देखील जीव गेला आहे.

या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की साटेलोटेच्या प्रथेला वहिनी तयार नव्हती. वहिनीने तिची मुलगी साटेलोोटेच्या प्रथेसाठी देण्यास नकार दिला. त्यामुळे संशयित आरोपी असलेल्या दोघा दिरांचे देखील लग्न ताटकळले होते. याचाच राग या सख्या दिरांना आला आणि त्यांनी वहिनीला संपवण्याचा कट रचला.

संशयित आरोपींनी घरात मोठा भाऊ नसल्याची संधी साधली आणि घटनेला परिणाम दिला. एवढेच नाही तर मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेलेल्या शेजाऱ्यावर देखील आरोपींनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती आहे. तर बारा वर्षाच्या पुतण्यावर देखील कुऱ्हाडीने प्राणघातक वार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान वहिनीची हत्या केल्यानंतर दोन आरोपींपैकी एकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो बचावला आहे. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात बारा वर्षांचा पुतण्या देखील जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

वहीने मुलीचे लग्न साटे लोटे पद्धतीने लावून देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांचे लग्न देखील ठरत नव्हते. याच रागातून दोघांनी वहिनीला संपवण्याचा कट रचला आणि कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली. झाले असे की, लग्नाचा विषय सुरू असतानाच जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर भांडण वाढत गेले आणि दिरांनी वहिनीवर कुऱ्हाड उचलून तिची हत्या केली.

विशेष म्हणजे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केलेल्या शेजाऱ्यांवर देखील संशयित आरोपींनी कुऱ्हाडीचा वार केला होता. त्यात शेजारी गंभीर जखमी झाले आणि त्यांचाही मृत्यू झाला. घटना घडत असताना कुटुंबातील एका मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेस स्थळ घटनास्थळ गाठले. त्यामुळे कुटुंबातील इतरांचे प्राण वाचले. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.