Home » खरशेतच्या ‘त्या’ पुलासाठी आमदार खोसकरांकडून दहा लाखांचा निधी

खरशेतच्या ‘त्या’ पुलासाठी आमदार खोसकरांकडून दहा लाखांचा निधी

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुकयातील शेंद्रीपाडा येथील महिलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाला होता. अखेर त्र्यंबक तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी आमदार निधीतून या कामासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत मधील सावरपाडा पैकी शेंद्रीपाडा येथील महिला डोक्यावरून पाणी आणतानाच जीवघेणा प्रवास सर्वांनीच पाहिला.यानंतर अनेक माध्यमांनी हि परिस्थिती आपल्या माध्यमातून उचलून धरली. परिणामी या ठिकाण स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून लोखंडी पूलासह विहीर देखील बांधण्यात येणार असल्याची महती मिळाली. त्यानंतर आता आमदार हिरामण खोसकर यांनी आमदार निधीतून दहा लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे.

खरशेत येथे आमदार हिरामण खोसकर यांनी भेट देत तास डोहाची पाहणी केली. यानंतर तात्काळ पाणीपुरवठा योजना चालु करणेबाबत जि.प.प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. सध्या हि जीवघेणी दरी ओलांडण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. आमदार खोसकर यांच्या निधीतून गडदवने येथील साठवण तलावाचे कामाला सुरूवात झाली असुन खडकओहोळ व गोलदरी येथेही याच प्रमाणे साठवण तलाव करून स्थानिकांची तहान भागविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

दरम्यान येथील परिस्थितीची कहाणी माध्यमांवर झळकल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी भेटी देत आश्वासनांचा भडीमार केला आहे. तर अनेक ठिकाणाहून मदतचा ओघ सुरु झाला आहे. मात्र इथल्या आदिवासी लोकांना तुमच्या सहानुभीतीची नाही तर मूलभूत सुविधांची आवश्यकता असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती असल्याने इथल्या शाळा डिजिटल मात्र पायाभूत सुविधांचा काय? असा सवाल ते उपस्थित करीत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!