महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव; बससेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचा फटका आता सर्वसामान्य प्रवाशांना (Common travelers affected by Maharashtra and Karnataka border dispute) बसत आहे. एकीकडे कर्नाटक सरकारने बस सेवा बंद केली (Karnataka government has stopped the bus service) तर दुसरीकडे महाराष्ट्रातूनही कर्नाटकच्या वाहनांना अडवून काळे फासले जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची बससेवा ठप्प झाली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे वातावरण चिघळले आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात बसला काळे फासण्याच्या घटना घडल्या आहे. अशात दोन्ही राज्यांच्या सीमांवर बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा वाद पुन्हा उफाळून आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी आधी जत तालुक्यातील ४० गावे आमच्याकडे येणार असल्याचे खळबळजणक वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. यानंतर पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट आणि सोलापूर भागावरही दावा ठोकला. यावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. या सीमावादावरून शाब्दिक वाद सुरु होता तोपर्यंत ठीक पण काल मात्र कन्नडिगांनी महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केल्याने वाद अजूनच भडकला. याचा परिणाम आता सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

वाद चिघळल्यानंतर कर्नाटक सरकार आडमुठेपणा वर आले आहे. काल महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करत त्यांची अडवणूक तेथील नागरिकांकडून केली जात होती. तर आजच्या दिवशी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये राज्य परिवहन विभागाच्या बसेस रोखण्यात आल्या आहेत. राज्य परिवहनाच्या काही बसेस कर्नाटकात सोडण्यात आल्या होत्या. मात्र त्या बस परतल्याच नाही. कर्नाटक सरकारच्या पोलीसांनी आणि परिवहन विभागाने त्या बसेस बस स्थानकाच्या आगारातच रोखून धरल्या असल्याची माहिती आहे. कर्नाटक सरकारच्या या धोरणामुळे प्रवाशांचे मात्र नाहक हाल होत आहे. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या प्रवाशांची विचारपूस केली असता काही प्रवाशांना तर अक्षरशः रडू कोसळल्याचे दिसून आले आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातूनही कर्नाटकच्या वाहनांना अडवून काळे फासले जात होते. त्यामुळे बससेवा दोन्ही बाजूने ठप्प झाली आहे. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात वाहनांना काळे फासण्यासह आंदोलन देखील होत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यात बसला काळे फासण्याच्या घटना घडल्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमांवर बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.