Home » टीईटी घोटाळा : नाशिक विभागात सर्वाधिक अपात्रांना केले पात्र

टीईटी घोटाळा : नाशिक विभागात सर्वाधिक अपात्रांना केले पात्र

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam case) प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून या घोटाळ्याचे नाशिक कनेक्शनही (TET exam scam Nashik connection) समोर आले आहे. नाशिक विभागातून सर्वाधिक अपात्रांना पात्र केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लाखो तरुणांच्या आयुष्याचा उध्वस्त करणाऱ्या आणि महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या टीईटी (TET) अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षेचे धागेदोरे पुन्हा नाशिक जिल्ह्यात वळले आहेत. एका नव्या माहितीनुसार नाशिक विभागात सर्वाधिक ०२ हजार ७७० पात्रांना पात्र केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मध्ये जी ए सॉफ्टवेअर प्रितेश देशमुख यांनी संगनमत करून ०७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींची पैसे घेऊन त्यांना पात्र केले होते. त्यातील एजंट कडील ११२६ अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे

त्याबरोबर या ०७ हजार ८८० अपात्रांपैकी सर्वाधिक २ हजार ७७० अपात्र परीक्षार्थी नाशिक विभागातील असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एकास अटक केली असून मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी असे या संशयिताचे नाव आहे. सूर्यवंशी याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत दिवसांची कोठडी देखील सुनावली आहे. सूर्यवंशी हा शिक्षक असून यातील आरोपी राजेंद्र सोळंके व मुकुंदा सूर्यवंशी हे दोघही मालेगाव येथे राहणारे आहेत.

ही परीक्षा २०१९-२० मधील अंतिम निकालात १६ हजार ६०५ परीक्षार्थींना पात्र गेले होते. त्यापैकी ७८०० अपात्र परीक्षार्थी कडून एजंट मार्फत पैसे घेऊन त्यांना पास करण्यात आले आहे. त्यापैकी नाशिक विभागातील अपात्र परीक्षार्थींना पात्र करणाऱ्यांची संख्या दोन हजार ७७० असून ती इतर विभागांच्या तुलनेत जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!