‘हा’ क्रिकेटर झाला पोलीस अधिकारी

भारतात ज्याप्रमाणे क्रिकेटपटूंना मानद पदवी देण्यात येते त्याचप्रमाणे पाकिस्तानात लोकप्रिय असलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाला मानद पदवी देण्यात आली आहे त्याला पाकिस्तानातील पोलीस अधिकाऱ्याची ही मानत पदवी देण्यात आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानातील तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे त्याला पाकिस्तानातील सरकारने मानद डीएसपी हे पद दिले असून त्याबरोबरच शाहीन आफ्रिदीला गुडविल ऍम्बेसेडरही करण्यात आलं आहे.

मानत डीएसपी हे पद स्वीकारतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. याबरोबरच वेगवान गोलंदाज शाईन आफ्रिदीने पोलिसांचे ब्रँड अँबेसिडर होणे अभिमानाची गोष्ट असल्याचे देखील सांगितल आहे. शाहीन आफ्रिदी तरुणांमध्ये लोकप्रिय असल्याने त्याला पोलिसांचा ब्रँड ऍम्बेसेडरही करण्यात आला आहे. ज्यामुळे पाकिस्तानातील तरुणांमध्ये पोलीस अधिकारी पोलीस भरती या संदर्भात जनजागृती व्हावी तसेच पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला हेतूने देखील शाहीन आफ्रिदीला ऍम्बेसेडर केल्याचे बोलले जात आहे.

शाहीनचे वडीलही होते पोलीस अधिकारी
पाकिस्तान सरकारने शाहीन आफ्रिदीला पोलिसांचं ऍम्बेसेडर केल आहे. त्याचबरोबर त्याला मानत डीएसपी हे पद देण्यात आल आहे. शाईन आफ्रिदी चे वडील हे एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून त्याचा भाऊ देखील पोलीस आहे.