नाशिक | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल जवळील चिंचओहोळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. स्कार्पियोमधून अवैधरित्या विदेशी मद्याच्या लाखो रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
होळी सणा साठी चोरट्या मार्गाने अवैधरित्या परराज्यातील विदेशी दारूची वाहतूक होती पण राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दावलेश्वर हरसुल रोड लगत महिंद्रा कंपनीचे स्कार्पिओस अडविल्यानंतर वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनामध्ये विदेशी बनावटीच्या हजारो बॉटल्स आढळून आल्या.
या कारवाईत सर्व मुद्देमाल व गाडी असा सात लाख ६२ हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संशयित दादा रामू बुधवार यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई एस एस देशमुख, कौसडीकर, जीबी साबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. याप्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक टीव्ही ठाकूर करत आहेत.