ट्रू जेटची नाशिक -अहमदाबाद सेवा ०१ मार्चपासून

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या उडान योजेनतंर्गत सुरु करण्यात आलेली ट्रू जेट विमान सेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे. मात्र लवकरच हि सेवा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्र शासनाच्या उडान योजनेला प्रतिसाद मिळाल्यानंतर नाशिकच्या ओझर विमानतळावरून अनेक शहरांना जोडणारी विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या नाशिकमधून पुणे, बेळगाव, तसेच नाशिक अहमदाबाद-दिल्ली अशी हॉपिंग सेवा सुरु आहे.

या सेवा वेगवेगळ्या कंपन्यांच्या असल्या तरी सध्या गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सेवांमध्ये व्यत्यय येत आहे. त्यातच आता ट्रू जेट कंपनीच्या काही अडचणीमुळे त्यांची नाशिक अहमदाबाद हि सेवा १० फेब्रुवारी पासून बंद आहे. हि सेवा येत्या ०१ मार्चपासून सुरु होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.