महासभेत महापौर कुलकर्णी आणि अजय बोरस्ते यांच्यात तू-तू मै-मै

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहराला स्मार्ट बनवणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पावरून महासभेत गोंधळ उडाला आहे. विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्यात तू तू मै मै बघायला मिळाली.

नाशिक महापालिका निवडणूक दोन महिन्यांवर आली असताना अद्यापही नाशकात होणाऱ्या अनेक कामांवरून खटके उडत आहेत. दरम्यान स्मार्ट सिटी संदर्भात सुरू असलेल्या कामांवर महापौर टीका करत असताना विरोध पक्ष आक्रमक झाले यामुळे महासभेत गोंधळ झाला. यावेळी नगरसेवक अजय बोरस्ते यांनी महापौरांना धारेवर धरत त्यांनाच याबाबत विचारणा केल्याने सभेत दोघांमध्ये तू तू मै मै झाली.

दरम्यान आज नाशिक महापालिकेने महासभा आयोजित केली होती. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनीच स्मार्ट सिटीच्या कामांवरून वाभाडे काढले. मात्र यावेळी बोरस्ते यांनी विरोध करीत, ‘तुम्ही सत्तेत असताना टीका का करता, कारवाई करा’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सत्तेत असूनही तुम्ही कारवाई करण्याचे सोडून टीका करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच मागणीवरून महासभेत काही काळ अजय बोरस्ते आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.