नाशिकरोडच्या दत्त मंदिर सिग्नलजवळ दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई । प्रतिनिधी
नाशिकरोडला सकाळी झालेल्या रिक्षा अपघातानंतर दत्त मंदिर सिग्नल जवळ दुचाकींचा भीषण अपघात झालं आहे. या दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक -पुणे महामार्गावर असलेल्या दत्त मंदिर सिग्नलजवळ हा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्त मंदिर सिग्नलच्या नजीक असलेल्या सद्गुरू हॉटेल समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.या धडकेत दुचाकीवरील महिला आणि पुरुष या दोघांचा जागीच मृत्यु झाला.

या भीषण अपघातानंतर वाहन चालक फरार झाला असून ते वाहन सिन्नरकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच उपनगर पोलिसांची दोन पथके त्या वाहनाच्या मागावर असून सीसीटीव्ही आधारे पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत.

दरम्यान सकाळी देखील नाशिकरोडच्या मिल्लत पब्लिक स्कुलबाहेर रिक्षा उलटली. या अपघातात देखील चार जण जखमी झाले आहेत.