विक्रीसाठी आणलेल्या दोन लाखांच्या मोबाईलची चोरी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या परिसरात हद्दीतून कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या एका पिकअप मधून दोन लाख रुपये किंमत असलेल्या मोबाईलची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी मोबाईल चोरट्यास जेरबंद करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले आहे.

नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत (दि. ०३) तीन मार्च रोजी दुपारच्या सुमारास नाशिक-पुणे हायवे रोडच्या पुलाखाली रोडवर कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या महिंद्रा पिकप गाडीतून धुळे येथे डिलिव्हरी बॉईज साठी ठेवलेले मोबाईल वॉच स्मार्ट वॉच असलेले खाती बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास लावण्यासाठी पथक तयार करण्यात आले होते.

दरम्यान गुन्हे शोध पथकातील पोलिस हवालदार राजेश कांबळे यांना यासंदर्भात माहिती मिळाली कि, मोबाईल बॉक्स चोरी करणारा संशयित नाशिकरोड भागात राहणारा आहे. त्याच्याकडे चोरी केलेला सव मुद्देमाल आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने या कारवाईसाठी पथक तयार केले. सदर ठिकाणी जात संशयित शुभम कोरडे यास ताब्यात घेण्यात आले.

यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच संशयित शुभम याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हे शोध पथकाचे पोलिसांनी संशयित आरोपी कडून दोन लाख १४ हजारांचे मोबाईल- स्मार्टवॉच असलेले बॉक्स जप्त केले केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार राजेश साबळे, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र जाधव हे करीत आहेत.