लवकरच नाशिक रोडचा पाणी प्रश्न सोडवला जाईल :- आ. ढिकले

नाशिक:- दिवसेंदिवस नाशिक शहर आउद्योगीक क्षेत्रात झपाट्याने क्रांती करत आहे. ग्रामीण भागातून शहरात नोकरी व्यवसायनिमित्त लोक स्थलांतरित होत आसल्यामुळे शहरामध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे नाशिक शहराजवळ असलेल्या २० ते २५ गावांमध्ये निसर्गरम्य वातावरणात मोठे मोठे गगनचुंबी इमारतींचे बांधकाम प्रकल्प उभे राहत आहे. मुंबई – पुण्यामधील गुंतवणूकदारांकडून नाशिक मध्ये घर घेण्याचा कल वाढत आहे.

स्थलांतरच्या निमित्ताने राज्यभरातून येणारे अधिकारीही निवृत्तीनंतर पर्यावरण पूरक वातावरण म्हणून नाशिक शहरांमध्ये थांबण्याचा निर्णय घेत आहेत. अशा विविध बाबींमुळे नाशिक शहराच्या लोकसंखेत झपाट्याने वाढ होत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत साधारण १० लाख नागरिक नाशिकमध्ये राहतात. मात्र केंद्राच्या विविध योजनांसाठी झालेल्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने हेच आकडे २३ लाखांच्या घरापर्यंत गेले आहेत. याव्यतिरिक्त पर्यटन व कामानिमित्त येणारे यांचा हिशोब केला तर २५ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करावा लागत आहे.

एकीकडे पाण्याची मागणी वाढत असली तरी पुरवठा करणारे स्त्रोत मर्यादित आहे. गंगापूर धरण समूहानंतर मुकणेवर प्रमुख भिस्त आहे. एकीकडे शहराची लोकसंख्या ३० लाखापर्यंत गेली असून दुसरीकडे गंगापूर धरण समूहावरून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने मुकणे धरणातून पाणीपुरवठ्याच्या मर्यादा लक्षात घेता दारणा धरणातून थेट दोन जलवाहिनी द्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची योजना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यातून मंजूर करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहे.

केंद्रशासनाच्या अमृत दोन योजनेतून निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून मात्र त्यातून निधी न मिळाल्यास सिहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यातून साधारण ६८० कोटी रुपये मिळवण्याची नाशिक प्रशासनाची धडपड सुरू आहे. नाशिकमहापालिके करता गंगापूर धरण समूह तसेच मुकणे व दारणा धरणातून एकूण ६००० दशलक्ष घनफूटपाणी आरक्षित करण्यात आले होते. नाशिक शहरातील वाढती लोकसंख्या आणि पाणी वापरण्याचा आढावा लक्षात घेता गंगापूर धरणा मधून ५००० दशलक्ष घनफूट दारणा धरणातून तर मुकणे धरणातून सोळाशे दलक्ष दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी आता महापालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे केली जाणार आहे.

परंतु केंद्र शासनाच्या अमृत २ या योजनेतून ६८० कोटी रुपये निधी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे या योजनेबरोबरच अन्य योजणांतून दारणात थेट पाणीपुरवठा योजनेला निधी मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुठल्याही प्रकारच्या आडचणी आल्या तरी नाशिक रोडचा पानी प्रश्न सोडवला जाईल. असे आमदार राहुल ढिकले यांनी म्हंटले आहे.