आम्ही भारतीय नेतृत्वाच्या सक्रिय पाठिंब्याची वाट पाहतोय!

नवी दिल्ली । प्रतिनिधी

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु झाले आहे. काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडल्याने परिस्थिती अधिक बिघडली गेली आहे. अशातच युक्रेनमधील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी असे म्हटले की, हे युद्ध थांबवण्यासाठी आम्ही भारतीय नेतृत्वाच्या सक्रिय पाठिंब्याची वाट पाहत आहोत.

रशियाच्या घोषणेनंतर युक्रेनमधील परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. युक्रेनची राजधानी कीवसह अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. एवढेच नाही तर हे हल्ले टाळण्यासाठी युक्रेनचे नागरिक सुरक्षित ठिकाणी जात आहेत. खरे तर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध ‘लष्करी कारवाई’ करण्याची घोषणा केली आहे.

अशातच युक्रेनमधील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी असे म्हटले की, हे युद्ध थांबवण्यासाठी आम्ही भारतीय नेतृत्वाच्या सक्रिय पाठिंब्याची वाट पाहत आहोत. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. त्यामुळे या जागतिक संघर्षाला थांबवणे आवश्यक असून हा युद्ध थांबविण्यासाठी भारतीय नेतुत्वाच्या पाठींब्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान रशियाच्या हल्ल्यात किमान सात जण ठार आणि नऊ जखमी झाल्याचे युक्रेनने सांगितले आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, ब्रोव्हरी आणि कीवमध्ये एक व्यक्ती ठार झाली आहे, तर एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या युक्रेनमध्ये गोळीबार होत आहे.रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती पाहता डेन्मार्कच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनची राजधानी कीव येथील दूतावास बंद केल्याची प्राथमिक माहिती सूत्राच्या माध्यमातून मिळते आहे.