पोलिस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

नाशिक । प्रतिनिधी
पोलिस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. राहुल भानुदास चौगुले (वय 22 रा. एक्सलो पॉईंट, अंबड) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,राहुल चौगुले याने गेल्या आठवड्यातच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. ऑनलाईन निकालात नापास झाल्याच लक्षात येताच राहुलने शनिवारी (दि. २१) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्यांनतर राहुलच्या वडिलांनी त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास चव्हाण,अमीर शेख करीत आहेत.